आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 व्यक्ती विशेष

राष्ट्रीय ग्रंथ ‘रामायण’…राजा देखील स्वत:ला रामाचे वंशज असल्याचं मानतो… जगातील एकमेव देश

नितीन देशपांडे   62   09-01-2025 20:22:00

भारतामध्ये श्रीरामांची मोठ्या भक्ती भावानं पूजा केली जाते. प्रार्थना केली जाते. दरवर्षी लाखो भाविक श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्याला जात असतात. मात्र भारतच नाही तर आशियामध्ये आणखी एक असा देश आहे, ज्या देशामध्ये बौद्ध लोकसंख्या बहुसंख्य आहे, मात्र तिथे श्रीरामांची पूजा केली जाते.

थायलंडमध्ये श्रीरामांची पूजा केली जाते, श्रीराम हे तेथील लोकांचं अराध्य दैवत आहे. ज्या प्रमाणे भारतामध्ये अयोध्या आहे.तसेच थायलंडमध्ये देखील अयुत्या नावाचं शहर आहे. हे शहर थायलंडची राजधानी बँकॉकच्या जवळच आहे.या शहरामध्ये विष्णू, ब्रम्हा महेश यांची देखील मंदिरं आहेत.येथील लोक मानतात की हे शहर म्हणजे प्रभू श्रीरामांची राजधानी आहे.

थायलंड हे पूर्वी हिंदू राष्ट्र होतं. त्यामुळे येथील राजा आणि त्याच्या कुटुंबावर हिंदू धर्माचा मोठा प्रभाव आहे. या देशाच्या राजाला येथील लोक भगवान विष्णूचा अवतार मानतात. थायलंडचा सध्याचा राजा देखील स्वत:ला रामाचे वंशज असल्याचं मानतो.एवढेच नाही तर राजा आपल्या नावाच्या आधी राम देखील लावतो.

राम दशम हे सध्या थायलंडचे राजे आहेत.राम दशम हे थायलंडमध्ये फुटबॉल प्रिन्स या नावाने देखील प्रसिद्ध आहेत.

येथील राष्ट्रीय ग्रंथ रामायण आहे, तेथे या ग्रंथाला राम कियेन असं म्हणतात, ज्याचा अर्थ रामाची किर्ती असा होतो.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.