आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 व्यक्ती विशेष

Khel Ratna Award 2024 : मनू भाकेर, डी गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार जाहीर

शिंदे राम   3   02-01-2025 18:00:14

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने (Union Ministry of Sports) आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये (Olympics) दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकेर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अथलीट प्रवीण कुमार या चार क्रीडापटूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत.

याबाबत क्रीडा मंत्रालयाने सांगितले की,”क्रीडा पुरस्कारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींचे परीक्षण आणि तपासणी केल्यानंतर सरकारने खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. समित्यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे सरकारने मनू भाकर (Manu Baker) डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना खेलरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मनू भाकरचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केले नव्हते, त्यामुळे वाद झाला होता.क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या एकूण ३२ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये १७ पॅराॲथलिट आहेत.

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत २ पदके जिंकून इतिहास रचला होता. एकाच ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धांमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. तर हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदक जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ होती. तर डी गुकेश हा काही आठवड्यांपूर्वीच बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला होता. त्याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी जगज्जेतेपद मिळविले होते.

तसेच २०२४ च्या खेलरत्न पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथे नाव प्रवीण कुमार (Praveen Kumar) याचे आहे. प्रवीण कुमारने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उच्च उडी या खेळ प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याला पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये टी ६४ चॅम्पियन म्हणून गैरविण्यात आले होते. ज्या खेळाडूंना गुडघ्याच्या खाली एक किंवा दोन्ही पाय नसतात ते टी ६४ प्रकारच्या खेळात सहभागी होत असतात.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.