PCMC तहलका न्यूज 370 29-08-2020 15:34:06
राज श्रीकांत ठाकरे (जन्म - जून १४ इ.स. १९६८, स्वरराज श्रीकांत ठाकरे) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. ठाकरे यांनी इ.स. २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तर प्रदेशी लोकांच्या लोंढ्याला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले. राज ठाकरे (खरे नाव स्वरराज) यांचा जन्म १४ जून इ.स. १९६८ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत. त्यांची आई मधुवंती ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्नी कै. मीना ठाकरे यांची बहीण लागतात. राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले. राजचे वडील कै. श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते. राज ठाकरे आपले काकांप्रमाणे व्यंग्यचित्रकार आहेत. वॉल्ट डिस्नी हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे. महाराष्ट्रात सर्व नेत्यांपैकी गुगलवर सर्वात जास्त सर्च होणारे नेते म्हणून इंटरनेटच्या विश्वातही त्यांचा दबदबा आहे. राज ठाकरे हे तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत.असे म्हटले जाते कि महाराष्ट्रातील मराठी नागरिक जास्तित जास्त अपेक्षा राज ठाकरे या व्यक्तीकडून ठेवतात.राज ठाकरे जादूगार आहेत अशी अपेक्षा ठेवल्या कारणानेच मनसेची लोकप्रियता घटली आहे. राजठाकरेंचे ध्येय हे खूप मोठे आहे."जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचाय" हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. राज ठाकरे हे कधीच हार न मानणाऱ्यांपैकी एक ओळखले जातात.त्यांचा पक्षाचा एकमेव आमदार असतानाही ज्याप्रकारे राज ठाकरे हे काम करतात व सत्ताधाऱ्यांनाही धडकी भरवतात अशी आज त्यांची ओळख आहे. शर्मिला ठाकरे ह्या राज ठाकरे यांच्या पत्नी असून, एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.