आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 आंतरराष्ट्रीय

गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश आणि डॉ.मनमोहनसिंग यांची भूमिका…तर महाराष्ट्राचे राजकारण बदलले असते

शिंदे राम   81   27-12-2024 12:43:39

राजेश कुलकर्णी 

मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते. ते एक सरळमार्गी आणि सुस्वभावी राजकारणी होते. महाराष्ट्र भाजपचे तेव्हाचे सर्वात मोठे नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्याबाबत कायम राजकीय परिघात एक चर्चा केली जाते. ती म्हणजे गोपीनाथराव मुंडे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, मात्र मनमोहनसिंग यांच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश टळला. अनेक नेत्यांनी ही गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे.

गोपीनाथराव मुंडे हे लोकसभेत उपनेते होते. तेव्हा ते स्वपक्ष असलेल्या भाजपवर नाराज होते. म्हणून त्यांनी काही आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. सगळंकाही ठरलं होतं. तयारीही झाली होती. मात्र ऐनवेळी तत्कालीन पंतप्रधान झालेल्या मनमोहनसिंग यांनी गोपीनाथरावांना रोखलं.

मनमोहन सिंग यांच्या मते, अशा पद्धतीने विरोधी पक्ष फोडणं योग्य नाही. मी पंतप्रधान असताना विरोधी पक्षाच्या उपनेत्याला काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार नाही. विरोधी पक्ष फोडून तो संपवणं योग्य ठरणार नाही, असं म्हणत त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पक्षप्रवेश टळला होता. मुंडेंसोबत बाकीचे आमदार जाऊ नयेत म्हणून विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत होते, असं अजित पवारांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. शेवटी मुंडेंनीच पक्ष सोडला नाही. मात्र गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश झाला असता तर नक्कीच आजचं भाजपचं चित्र वेगळं राहिलं असतं. 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.