निखिल देसाई :-
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं गुरुवारी निधन झालं. त्यांनी वयाच्या ९२व्या वर्षी दिल्लीतील एक्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.मनमोहन सिंग यांच्या निधानानंतर आता सोशल मीडियावर त्यांच्याशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला जातो आहे. याबरोबरच त्यांच्याशी संबंधित एका किस्साचीही जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे हा किस्सा स्वत: मनमोहन सिंग यांनी सांगितला होता. २०१८ मध्ये मनमोहन सिंग बंगळुरूमध्ये काँग्रेससाठी प्रचार करत होते. यावेळी पत्रकारारांशी संवाद साधताना त्यांनी मोहम्मद अली जिना यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, १९४५ साली मी लाहोरमध्ये शिक्षण घेत होतो. त्यावेळी माझं वय १३-१४ वर्ष असेल, तेव्हा आम्ही शाळेच्या मैदानात हॉकी खेळायचो.”
आम्ही ज्या मैदानावर खेळायचो, त्या मैदानाच्या बाजुलाच मोहम्मद अली जिना यांचं घर होतं. एकेदिवशी आम्ही शाळेच्या मैदानात हॉकी खेळत होतो. खेळता खेळता मी गोलपोस्टच्या दिशेने जोरदार चेंडू भिरकावला. मात्र, माझा नेम चुकला आणि चेंडू थेट मैदानाच्या बाजुला असलेल्या मोहम्मद जिना यांच्या घराच्या दिशेने गेला.”
”मोहम्मद अली जिना त्यावेळी आंगणात उभे होते. मी मारलेला चेंडू थेट जिना यांच्या डोक्यावर जाऊन लागला. त्यामुळे जिना जखमी झाले. चेंडू इतका जोरदार लागला की त्यांना रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले”, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं.