दिल्ली प्रतिनिधी- : Manmohan Singh Death भारताचे माजी पंतप्रधानडॉ. मनमोहन सिंग हे गुरुवारी रात्री कालवश झाले. प्रख्यात अर्थतज्ज्ञ असणाऱ्या डॉ. सिंग यांनी पंतप्रधानपदी असताना विविध योजना राबवत देशाच्या विकासात भरीव योगदान दिले.
डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला दिली आणि ती म्हणजे आधार कार्ड.
आजच्या काळात आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. लहान मुलापासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सिमकार्ड मिळण्यापासून ते शाळेत प्रवेश घेणे, सरकारी नोकरी मिळणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, असे सर्वत्र वापरले जाते.
सोप्या भाषेत सांगायचे तर, जेथे पडताळणी आवश्यक असेल किंवा आयडी प्रूफ आवश्यक असेल तेथे ते आवश्यक आहे. आधार कार्ड आमच्या बँक खात्याशी जोडलेले आहे, त्यामुळे त्याची सुरक्षाही महत्त्वाची आहे.
आपण आपले अनेक ठिकाणी आपले आधार कार्ड देतो. आपल्या आधार कार्डची प्रत कोणी कशी वापरेल हे आपल्याला नंतर कळतही नाही. आधार कार्डमध्ये आपले वैयक्तिक आणि चरित्रात्मक तपशील असतात, त्यामुळे जर ते चुकीच्या हातात पडले तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. मात्र, तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकता.
संयुक्त राष्ट्रांनी आधार कार्ड योजनेची पुष्कळ प्रशंसा केली; परंतु कमालीची गोष्ट अशी की आधार कार्ड योजनेविषयी संशय घेणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. त्यावेळचा विरोधी पक्ष आधार कार्डाविषयी आक्रमक होता. 'हे कार्ड तयार करण्यासाठी सरकार लोकांकडून माहिती घेईल; पण त्याचा दुरुपयोग झाला तर काय?'- असा प्रश्न लोकांच्या मनात पेरला गेला. पण त्याविषयीच्या शंका-कुशंका निराधार ठरल्या. आज आधार कार्ड सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. पॅन कार्ड असो, मोबाइल नंबर की बँकेचे खाते; सगळीकडे आधार कार्ड अनिवार्य आहे. आपण ज्या वेगाने डिजिटलायझेशनच्या दिशेने जात आहोत, त्यात आधार कार्डाचे खूप मोठे योगदान आहे.