" सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांनी वाढवल्या जेजूरी खंडोबाच्या अडचणी."
पुरंदर तालुक्यातील जेजुरीचा खंडेराया हा महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहे .
सुरूवातीला सुप्रिया सुळे यांनी पति सदानंद सुळे यांच्या सह खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी पाच पायऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना सदानंद सुळे यांनी उचलून घेतले.
खासदार सुळे यांनी खंडेरायाला शेतकऱ्यांच्या वर आलेले "आसमानी व सुलतानी हे भाजप सरकारचे संकट दूर करण्यासाठी घातले साकडे"
त्यानंतर नंबर लावला तो बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार
सौ कांचन राहूल कुल यांनी ही जेजुरीचे खंडेराया यांना साकडे घालण्यासाठी आपले पतीराजे आमदार राहूल कुल यांच्या बरोबर जेजुरी गाठली व परंपरे प्रमाणे आमदार राहूल कुल यांनी ही आपली धर्म पत्नी कांचन कुल यांना उचलून पाच पायऱ्या चढून खंडेरायाला सौ कांचन कुल यांनी ही शेतकरी हितासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस आघाडीला सत्तेवर येऊच देऊ नको असे साकडे घातल्याचे बोलले जात आहे .
सदानंद सुळे व राहूल कुल या दोघांनी पाच- पाच पायऱ्या आपल्या आपल्या पत्नीला उचलून दाखवून दिले.
" हम भी किसीसे कम नहीं "
आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना" खंडेराया" माञ मोठ्या संकटात असल्याचे जाणवले की कोणाचे साकडे खरे ठरणार हे आपल्याला निवडणूक निकाला नंतर कळेलच पण तोपर्यंत तर
जेजुरीचा खंडेराया बारमतीच्या एका "लेकीला" पावाणारच हे माञ ठरलेल आहे .