"एक लिटरचे पैसे घ्या व 800 ml चांगले पेट्रोल द्या" एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने केंद्र सरकार व केंद्रीय पेट्रोल मंत्री यांच्याकडे मागणी.
सध्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिक्स असलेले पेट्रोल मिळत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या गाडीचे नुकसान होत आहे. यासाठीच एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कर्वे रोड गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन येथे इथेनॉल विरहित पेट्रोल मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
तसेच इथेनॉल हे पेट्रोलियम कंपन्यांना महाग दराने खरेदी करून पेट्रोलमध्ये मिक्स करत आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांचे मायलेज कमी झाले आहे. तसेच इथेनॉलमुळे जास्त प्रदूषण होत आहे साधारण पूर्वी एक लिटर पेट्रोलमध्ये एखादी टू व्हीलर 40 किलोमीटर मायलेज देत असेल तर ती आता 32 ते 33 किलोमीटर मायलेज देत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा महिन्याचा पेट्रोलचा खर्चही वाढला आहे तसेच सकाळी गाडी स्टार्ट करण्यासाठी वेळ लागत आहे व स्टार्ट केल्यानंतर नॉर्मल करण्यासाठी तीन ते चार मिनिट रेस करावी लागते तसेच वारंवार गाडीला सव्हिर्सिंग करून घ्यावे लागत आहे यामुळे सर्वसामान्य जनतेचा खर्च वाढला आहे केंद्र सरकारने व पेट्रोलियम मंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या या अडचणींवरती योग्य तो पर्याय निवडावा किंवा त्या ग्राहकांना 800 एम.एल. इथेनॉल विरहित पेट्रोल मिळावे अशी मागणी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर यांनी यावेळी केली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर, मंडळाचे उपाध्यक्ष संतोष बाहेती, सेक्रेटरी सतीश खैरे, महिला संघटक भारती घारे, उत्सव प्रमुख राजू मोतीवाले, खजिनदार सुरेश निंबाळकर, आशिष वेलणकर अण्णा वाळूज, उदय लेले व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.