सरकारी मदतीस पात्र ठरून देखील 607 शेतकयांची आत्महत्या झाल्या.या मुळे सरकारच्या शेतकरी कल्याण योजना फोल ठरताना दिसत आहे.
सरकारने शेतकरी उत्पन्न दुप्पट करण्याची योजना राबवली होती, शेतकयांचे उत्पन्न डबल होते की आत्महात्या डबल होता आहेत हा प्रश्न आकडेवारीवरून पडला आहे. गेला 8 महिन्यात तब्बल 1183 शेतकयांनी आत्महत्या केल्या छत्रपती संभाजीनगर विभागात 520, पश्चिम विदर्भात 707 शेतकयांच्या आत्महत्यांची नोंद झाली, भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रगत कृषीप्रधान राज्य असलेलेला महाराष्ट्रातील शेळ्यांवर दयणीय अवस्था
राज्यात 14 आत्महत्या प्रवण जिल्हे आहेत. एकट्या यवतमाळ जिल्हात ऑगस्ट महिन्यात तब्बल 44 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नापिकी अतिवृष्टी अवकाळी पाऊस कर्जबाजारीपणा योग्य हमीभाव न मिळणे अशा विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्यांमध्ये युवक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे दिसून येते