बारामती पाटस पालखी महामार्गावर जराडवाडी गावाच्या हद्दीत बारामतीकडून पाटस कडे जाणाऱ्या दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला.या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर महिला जखमी झाली आहे.संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच विशाल कोकरे यांचा कुरकुंभ एमआयडीसी मध्ये नोकरीस जात असताना विरुद्ध बाजूने चारचाकी आल्याने अपघात होऊन मृत्यू झाला होता.
समोर आलेल्या माहिती नुसार शरद दत्तात्रय मोरे वय 36 वर्षे सोनवडी ता. बारामती व ज्ञानेश्वर बबन वलेकर वय 42 वर्षे,दहिगाव तालुका माळशिरस अशी मृतांची नावे असून आक्कामाई ज्ञानेश्वर वलेकर असं जखमी महिलेच नाव आहे.
ह्या अपघातात देखील एक दुचाकी विरुद्ध बाजूने आल्याने पाटसकडे निघालेल्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दोघे जागीच ठार झाले. विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांवरती प्रशासनाने कडक कारवाई करून चालकांचे लायसन रद्द करावे अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे.