आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 महाराष्ट्र

अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना, हवेतूनच पाळणा तुटला;

अजिंक्य एकाड   2422   18-06-2025 18:19:24

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू झालेले आहेत. मात्र साहशी पर्यटन अजून चालू आहे. अकलूज येथील सयाजीराजे पार्क साहशी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. या पार्कमध्ये आजूबाजूच्या दोन ते तीन जिल्ह्यातील पर्यटक वर्षभर पर्यटनासाठी येत असतात.

 भिगवन येथील तरुण पर्यटक सयाजीराजे पार्क येथे साहशी खेळाचा आनंद घेण्यासाठी गेले होते.पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.या दुर्घटनेत भिगवण येथील व्यावसायिक तुषार धुमाळ  गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. धुमाळ हे भिगवण येथील नावाजलेले एलआयसी उद्योजक आहेत. दरम्यान, अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 नम्र स्वभावाचे, दुःखात सर्वांना साथ देणारे युवा उद्योजक तुषार धुमाळ यांच्या निधनाने भिगवन मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सयाजी राजे पार्क प्रशासनाने साहित्यांची योग्य देखभाल केली असती तर हा अपघात टाळायला गेला असता अशी भावना पर्यटक आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

 पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरात देखील अशाच प्रकारचे साहसी खेळायचे पार्क आहेत त्या पार्कमधील साहित्यांची योग्य देखभाल केली जात आहे का याची चौकशी प्रशासन करणे गरजे चे आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.