एमपीएससीच्या(MPSC) विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश
एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आंदोलन सुरू केलेलं होतं. ह्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सदर परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 27,28 व 29 मे 2025 ह्या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत.2024 साली जाहीर झालेल्या राज्यसेवेतील ही मुख्य परीक्षा सुधारित तारखेनुसार घेतली जाईल.
या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील तब्बल साडेआठ हजार विद्यार्थी बसलेले होते. आरक्षणासंदर्भातील असलेल्या अडचणींमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू केले होते.
MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी काय होती?
1. राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलावी.
2. SCBC-EWS आरक्षणा संदर्भात उमेदवारांचा संभ्रम दूर करावा.
3. अ राजपत्रित(PSI. STI )परीक्षेच्या जागा वाढवाव्यात.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया.
मी गेल्या तीन वर्षापासून राज्यसेवेची तयारी करत आहे. दरवर्षी मी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र होत असतो. मात्र सरकारच्या भोंगळ कारभारामुळे आणि आरक्षणासंदर्भात असलेल्या अडचणीमुळे अनेक उमेदवारांचे भविष्य अंधकारमय झाल आहे. सरकारने लवकरात लवकर या अडचणी सोडवून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे रहावे. समाधान काळे.