आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 महाराष्ट्र

कुख्यात गुंड निलेश घायवळवर हल्ला

अजिंक्य एकाड   7017   12-04-2025 09:08:37

कुख्यात गुंड निलेश घायवळवर हल्ला 

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर भूम तालुक्यातील अंदरुड गावात जत्रेनिमित्य भरलेल्या कुस्त्यांच्या मैदानात हल्ला झाला.यात्रे निम्मित कुस्ती चे मैदान आयोजित करण्यात आले होते त्या वेळी घायवळ पहिलवानांना भेटायला गेला असता त्याच्यावर हल्ला झाला. हा हल्ला पहिलवानाने केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.हल्ला केलेला पहिलवान अहिल्यानगर जिल्यातील जामखेड तालुक्यातील आहे.घटनेच्या संबंधित व्हिडिओ सोशल मिडिया वरती व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध कुस्तीपटू थापा ची कुस्ती चालू असताना संपूर्ण मैदानजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती ह्या गर्दीचा फायदा घेऊन घायवळ वरती हल्ला झाला असल्याची माहिती समोर येत आहे.ह्या हल्ल्या मुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.