आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 महाराष्ट्र

हैदराबाद मध्ये वन्य प्राण्यांचा आक्रोश

अजिंक्य एकाड   4255   05-04-2025 00:02:21

तेलंगणात वन्य प्राण्यांचा आक्रोश 

माणसं उठली प्राण्यांच्या जीवावर 

जागतिकीकरणात विकासाच्या नावावरती पर्यावरणाची अतोनात हानी केली जात आहे. ह्या अति लोभी माणसाने मुक्या प्राण्यांनाही सोडले नाही. मानवी समुदायाची उत्पत्ती ही निसर्गातूनच झाली आहे आणि ह्याच निसर्गाच्या जीवावर मानव उठलेला आहे.

जंगल तोडीची हृदय पिळवटून टाकणारी घटना तेलंगणामध्ये घडली. हैदराबाद शहराच्या मध्यभागी असणारे 400 एकर जंगल तब्बल 35 ते 40 JCB ने रातोरात नष्ट करण्याचे काम ह्या लोभी मानवाने केले ह्या मध्ये मोर, हरीण, जंगली प्राणी इकडे तिकडे सैरावैरा पळत होती. रात्रीच्या वेळी झाडांची कत्तल करण्यात आली.

या घटनेला पर्यावरण प्रेमी आणि हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विरोध केला. तेलंगणा उच्च न्यायालयाने सदर जागेवरील जंगलतोड थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत.

 

एकीकडे तुकाराम महाराजांनी 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असा उपदेश दिला तर दुसरीकडे काँक्रीटचे जंगल उभारण्यासाठी हिरवेगार सजीव जंगलाची अक्षरशा कत्तल केली जात आहे.

हे जंगल नष्ट करून तेलंगणा सरकार त्या ठिकाणी आयटी पार्क उभारणार आहे. मात्र या जंगलतोडीमध्ये प्राण्यांचे घर नष्ट झाले आहे.हा प्रसंग बघून मन हेलावून जाते.

 माणसाने स्वतःचा विकास केला पाहिजे मात्र या विकासाची शिक्षा मुक्या प्राण्यांना बसता कामा नये.माणसाप्रमाणेच त्यांनाही जीवन जगण्यास अधिकार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.