आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 उत्तर प्रदेश

Kazakhstan Plane Crashes: ७० हून अधिक प्रवासी असलेल्या विमानाचा थरकाप उडवणारा अपघात, अनेकांचा मृत्यू

नितीन देशपांडे   451   25-12-2024 15:23:12

दिल्ली । Delhi कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये विमानाला अपघात झाल्याने मोठी दुर्घटना (Accident) घडली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ हे विमान क्रॅश (Plane crash) झाल्यानंतर स्फोट झाल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

विमानातील तांत्रिक बिघाडानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडींगसाठी सूचना केली होती. मात्र, पुढे काय झालं हे अद्याप कळू शकलं नाही. दरम्यान, विमान क्रॅश झाल्याने मोठी जिवीतहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ख्रिसमसच्या (Christmas) सणादिवशीच हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजरबाईजन एरलाईनचं हे विमान असून या विमानातून ७० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अझरबैजन एअरलाइन्सचं हे विमान बुधवारी अझरबैजनच्या बाकू येथून रशियातील चेचन्या इथे जात होतं. दरम्यान या विमानाला कझाकस्तानच्या अक्ताऊ विमानतळाजवळ मोठा अपघात झाला आहे. या अपघातात अनेक लोक मृत्यूमुखी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत विमानाने हेलकावे खात लँडींग करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विमानात स्फोट झाल्याचं दिसत आहे. यानंतर धुराचे लोट घटनास्थळी दिसून आले आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.