आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 महाराष्ट्र

मुस्लिम समाजाला आरक्षण व संरक्षण देणार - गोपिचंद पडळकर

PCMC तहलका न्यूज  7118   19-04-2019 09:45:00

मुस्लीम समाजाला आरक्षण आणि संरक्षण देणार - गोपिचंद पडळकर.

 

 स्वाभिमानी मुस्लीम समाजाचा गोपिचंद पडळकर यांना जाहिर पाठिंबा  

त्यावेळी पञकार परिषदेत बोलताना गोपिचंद पडळकर म्हणाले मी खासदार झाला तर सांगली शहर व जिल्हा भयमुक्त करणार जातिय दंगली भडकवून तरुणांच्या हातात लाठ्या , काठ्या, तलवारी देण्यापैक्षा त्या युवकांच्या हातात पेन पुस्तक देऊन उत्तम नागरिक होण्यासाठी तरुणांना मदत करून विकास करणार 

विशेष करून मुस्लीम समाजाला  आरक्षण मिळवून देण्यासाठी संसदेत त्यांचाच ऐक घटक म्हणून त्यांची बाजू भक्कम पणे मांडणार आहे यापुढे मुस्लीम बांधवांवर जर कोणी अन्याय केला तर गोपिचंद पडळकर त्यांना संरक्षण देणार मुस्लीम मुलांच्या शिक्षणाच्यासाठी देशातील सर्वात सुसज्ज वसतिगृह उभारण्याचा माझा मानस असल्याचे गोपिचंद पडळकर बोलले.

सत्तर वर्ष कॉग्रेसने फक्त मुस्लीम समाजाचा मतासाठी वापर केला व मुस्लीम बांधवांना सतत गृहीत धरून स्वतःचा राजकीय व आर्थिक प्रंचड फायदा  सांगलीतील कॉग्रेसने केला आहे म्हणून मला निवडून द्या मी आपले सगळे प्रश्न सोडवतो असे पडळकर यांनी मत मांडले .


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.