आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 महाराष्ट्र

माढ्यात धनगर समाज राष्ट्रवादी व भाजपवर नाराज

PCMC तहलका न्यूज  8301   15-04-2019 05:59:00

 

बिदाल प्रतिनिधी दि१६

माढा लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागून राहिले आहे.२००९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी धनगर आरक्षण आश्वासन दिले होते.मात्र संसदेत धनगर आरक्षण प्रशन मांडण्यात अपयशी ठरले त्यामुळे माढ्यातील धनगर समाज थेट शरद पवार यांच्या नाराज आहे.२०१४ साली राष्ट्रवादीचे खासदार  विजयसिंह मोहिते यांनी सुध्दा धनगर आरक्षणासाठी संसदेत प्रशन उपस्थित न केल्यामुळे  धनगर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहे.माढ्यातील धनगर समाजाने दोन्हीवेळी राष्ट्रवादीचा खासदार निवडणूक दिला मात्र मतासाठी फक्त वापर करण्यात असल्याचे चर्चा सुरु आहे.

 

     २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर धनगर आरक्षण या मुद्दावर संपूर्ण राज्यात  आंदोलन करण्यात आली होती.पंढरपूर ते बारामती आरक्षाणासाठी पायी यात्रा काढण्यात आली होती.त्यावेळींचे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर धनगर आरक्षण देऊ हे आश्वासन दिले मात्र धनगर समाजाला आदिवासी आरक्षण लागू करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांवर नाराजी व्यक्त करत आहेत.

     

     माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा, पंढरपूर, माण ,खटाव ,माळशिरस, फलटण ,सांगोला, माढा  या आठही तालुक्यात ग्रामीण भागात धनगर समाजाची लोकसंख्या असताना सुध्दा राष्ट्रवादी -काँग्रेस आघाडी तर भाजप -शिवसेना या युतीने धनगर समाजातील एक सुध्दा उमेदवार तिकीट न दिल्यामुळे आघाडी आणि युतीवर महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे.वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात सात उमेदवार धनगर समाजातील दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जास्त लोकसंख्या असलेल्या समाज वंचित आघाडीकडे वळणावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

         माढा लोकसभासाठी रासपाचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर ,उत्तम जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील,सांगोलाचे आमदार गणपतराव देशमुख ,सचिन पडळकर यांना उमेदवारी दिले पाहिजे ही मागणी धनगर समाजाने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.तरी सुध्दा विचार न करता काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष रणजित निबांळकर यांनाच भाजपने उमेदवारी दिले तर राष्ट्रवादीनं संजय शिंदेनां उमेदवारी दिली. त्यामुळे माढा लोकसभासाठी धनगर समाजातील नउ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नऊ उमेदवार असल्याने मताची विभागणी होणार असल्याने माढा खासदार कोण होणार हे सध्या तरी कोणालाच सांगता येत नाही.राष्ट्रवादी व भाजपला धनगर  समाजातील नाराजी कमी करण्यासाठी जिल्हा परिषद ,पंचायत समिती, बाजार समिती, कारखाने,जिल्हा बँक व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये खुर्चीवर बसावे लागणार आहे.

 

माण ,खटाव या दोन्ही तालुक्यात असणाऱ्या दुष्काळीमुळे येथील असणाऱ्या मेंढपाळाना चारा व पाण्यासाठी कराड,सातारा ,कोरगाव ,वाई रहिमतपूर या परिसरात स्थलांतर करावे लागते मात्र येथील मागील  खासदार शरद पवार ,विजयसिंह मोहिते यांनी वर कधी लक्ष्यच दिले नाही.

 

 

 

नउ उमेदवार रिंगणात

पक्ष

वंचित बहुजन आघाडी -अँड विजय मोरे

बहुजन  रिपब्लिकन सोशालिस्ट -इंजि रामचंद्र घुटूकटे

हिंदुस्थान प्रजा -नवनाथ पाटील

बहुजन आझाद -मारुती केसकर

 

अपक्ष

सचिन पडळकर

संतोष बिचकुले

बापूराव रुपवनर

दत्तात्रय खटके

सिध्देश्वर आवारे

 

मुख्य मागण्या

१)धनगर आदिवासी प्रमाणे आरक्षण लागू करणे

२)मेंढपाळासाठी विमा योजना सुरू

३)धनगर समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी

४)स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता

५)शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाढ करणे.

 

चर्चा

संजय शिंदे व रणजित निबांळकर यांच्यातील कोणही झाल्यास खासदार धनगर समाजाचा आरक्षण प्रशन संसदेत न उपस्थित केल्यास घरावर मोर्चा


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.