आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची दुष्काळी मदतीविषयी मोठी घोषणा

नितीन देशपांडे   198   27-11-2026 11:52:20

Pune 

शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात 5 हजार रुपयांची अग्रिम मदत मिळाली आहे. तर ईकेवायसी, फार्मर आयडी यामुळे आजही लाखो शेतकऱ्यांना अग्रिम मदत मिळालेली नाही.

त्याचवेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळी मदतीविषयी मोठी घोषणा केली आहे. दुष्काळी मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. हा प्रस्ताव दुरुस्तीसह केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आता शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळणार आहे.

NDRF च्या मदतीत मोठी वाढ

राज्य शासनाकडून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा प्रस्ताव जास्त रकमेचा गेलेला आहे. एन डी आर एफ च्या माध्यमातून मदत मिळत होती. त्या रकमेत वाढ केली आहे. साडेआठ हजार रुपये हेक्टरी पूर्वी आपण मदत करत होतो. त्याऐवजी आता आपण 11 हजार रुपये हेक्टरी मदत करणार आहोत. जिथे 17 हजार रुपये मदत करत होतो ते 22 हजार रुपये केली आहे, वार्षिक पिकाचे 22 हजार रुपयांऐवजी आता 30 हजार रुपये मदतीचा आकडा करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर

भरणे यांनी दुरुस्त्यांसह नवीन प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची माहिती दिली. आपण प्रत्येक मदतीचा आकडा वाढवला आहे केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवलाय. त्याबाबतीत दुरुस्त्या करून राज्याचा 15 -16 हजार रुपये कोटी मदत कृषी विभागासाठी होते तर इतर विभागासाठी 36 हजार कोटी रुपये केंद्राकडे अहवाल पाठवलेला आहे. मात्र, तो व्यवस्थित गेला पाहिजे. दुरुस्त्या करावा लागणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटलेले आहेत. केंद्रातून शेतकऱ्यांना मदतीसाठी सकारात्मक आहे मदतीची रक्कम वाढणार आहे. अहवाल दुरुस्ती प्रस्ताव पाठवत आहे. केंद्रातून राज्याला जास्तीत जास्त कशी मदत मिळेल आपण प्रयत्न निश्चित करत आहे. केंद्र सरकारकडून मदत आल्यानंतर शेतकऱ्यांना दुष्काळ मदत मिळणार आहे. पण आपण केंद्राची वाट न बघता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना दुष्काळ मदत विविध माध्यमातून देणार असल्याचे मत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेत बोलताना गुरुवारी सांगितले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.