आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात

शरद लाटे  158   24-11-2026 12:37:39

Pune 

दहा कोटींच्या बदल्यात कंपनीला आदिवासींची जमिन मिळवून देण्याचा दावा करणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे वादात सापडलेत. कंपनीच्या (Pune News) एका अधिकाऱ्यासोबत देवराम लांडे (Devram Lande) आणि त्यांचा मुलगा अमोल लांडे हे बोलणी करत असल्याची ऑडिओ क्लीप समोर आली आहे

त्याचबरोबर देवराम लांडे (Devram Lande) यांच्या स्टींग ऑपरेशनचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामधे दहा कोटींची रक्कम हवाला मार्फत स्विकारच ठरल्यावर दोनशे रुपयांच्या नोटेचे दोन तुकडे करुन त्यांची देवाणघेवाण झाल्याचा हा व्हिडीओ आहे. देवराम लांडे (Devram Lande) हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असुन त्यांची सुन जुन्नर तालुक्यातुन जिल्हा परिषदेची विद्यमान सरपंच आहे. देवराम लांडे (Devram Lande) यांनी २०२४ ला वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. देवराम लांडे या ऑडियो क्लीपमधे प्रकल्पांबद्दल बातम्या देणाऱ्या स्थानिक पत्रकारांना आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनके यांनाही आपण कंपनीच्या बाजुने वळवून घेऊ असा दावा करत आहेत. त्याचबरोबर देवराम लांडे यांनी या ऑडिओ क्लीपमधे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचंही समोर आला आहे.(Pune News)

नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे जिल्हातील जुन्नर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या जलविद्युत प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांमधे देवराम लांडे आघाडीवर होते. एवढच नाही तर ठाणे जिल्यातील मुरबाड तालुक्यात होत असलेल्या टोरंट कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी देखील लांडे यांनी आंदोलने केली होती. मात्र लांडे यांची आंदोलने म्हणजे दिखावा असल्याच समोर आलं आहे. आंदोलन करण्याचा बहाणा करुन कंपनीकडून पैसे स्विकारण्यास लांडे तयार झाल्याने जुन्नर तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येतोय. तर लांडे यांनी आपणास फोन करणाऱ्या व्यक्तीने दहा कोटींचे अमिष दाखवल्याने आपण त्या व्यक्तीला भेटलो असा दावा केला आहे. त्याचबरोबर आपणला संबंधित व्यक्तीचा फोन आला होता, मात्र आपण त्याला पुराव्यांसह पकडून देण्यासाठी त्याच्याशी बोलत होतो असा दावा केला आहे.(Devram Lande)

देवराम लांडेंशी कंपनीचा अधिकारी म्हणून काम करणारा व्यक्ती हा जुन्नर तालुक्यातील स्थानिक व्यक्तीच असल्याची चर्चा आहे. देवराम लांडे यांचे ढोंग समोर आणण्यासाठी या व्यक्तीने लांडे यांच्याशी फोनवर बोलून त्यांच पितळ उघडं पाडल्याच बोलल जातं आहे. मात्र लांडे यांच्या संभाषणामुळे जुन्नर तालचक्यातील स्थानिक पत्रकारांची बदनामी झाल्याने या पत्रकारांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर देवराम लांडे यांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीसांकडे तक्रार दिली आहे. दरम्यान लांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य केल्याने मनसेकडून लांडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. देवराम लांडे हे पुणे, ठाणे आणि इतर आदिवासी भागांमधे प्रस्तावीत असलेल्या प्रकल्पांना विरोध करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत. मात्र त्यांच्या या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लीप नंतर त्यांना या समितीतून काढून टाकण्याची मागणी होतं आहे. त्यांची एक ऑडिओ क्लीप आणि सीसीटिव्ही फुटेजही समोर आलं आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.