आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नितीन देशपांडे   302   20-11-2026 14:13:52

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पंचूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सावित्री देवी या उत्तराखंडमधील पंचूर गावात आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. रविवारी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर डॉक्टरांनाही बोलावण्यात आले होते. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशसह राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.