आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

घोटवडे-मातेरेवाडी येथील प्रलंबित वीजप्रश्न मार्गी; सभापती मंदाताई शेळके यांच्या प्रयत्नांना यश!

शिंदे राम   504   27-10-2026 20:48:52

महावितरणच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांची नाराजी; तातडीने उपाययोजना केल्याने ग्रामस्थांना दिलासा

मुळशी : मुळशी तालुक्यातील घोटवडे-मातेरेवाडी येथील नागरिकांचा बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला वीजपुरवठ्याचा प्रश्न अखेर भोर राजगड मुळशी चे कार्यसम्राट आमदार श्री शंकरभाऊ मांडेकर यांनी सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांना सूचना देऊन त्वरीत काम करण्याचे आदेश दिले व पंचायत समितीच्या सभापती सौ. मंदाताई बाबाजी शेळके यांच्या प्रयत्नांतून मार्गी लागले आहे. या प्रश्नाबाबत सातत्याने पाठपुरावा करून स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यात आला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

घोटवडे-मातेरेवाडी परिसरात वारंवार वीजसमस्या निर्माण होत असल्याने स्थानिक शेतकरी व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत स्थानिक शेतकरी संदीप साठे, कस्तुर मातेरे, प्रकाश मातेरे, अंकुश घोगरे, लहुशेठ घोगरे यांच्यासह ग्रामस्थांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.

याबाबत बोलताना स्थानिक शेतकरी संदीप साठे म्हणाले, “महावितरणच्या गलथान कारभारामुळे घोटवडे-मातेरेवाडी परिसरात वारंवार वीजसमस्या निर्माण होत होती. याबाबत आम्ही मुळशी पंचायत समितीच्या सभापती सौ. मंदाताई बाबाजी शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष बाबाजी शेळके यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी तातडीने प्रशासनाला सूचना देत आवश्यक उपाययोजना करण्याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर प्रशासनानेही त्वरित कार्यवाही केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.”

या प्रलंबित प्रश्नाची दखल घेऊन तो मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल स्थानिक शेतकरी संदीप साठे यांनी सभापती सौ. मंदाताई बाबाजी शेळके, बाबाजी शेळके तसेच संबंधित प्रशासनाचे आभार मानले.

नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तत्परतेने पुढाकार घेतल्यास


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.