आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

तामिळनाडूवरून हापूस आंब्याची बाजार समितीत आवक; आंबाप्रेमींसाठी आनंदाची बातमी!

शरद लाटे  244   27-10-2026 09:21:24

Pune 

कोल्‍हापूर शेती उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये सोमवारी तामिळनाडूवरुन हापूस आंबा दाखल झाला. समितीमधील दस्‍तगीर बागवान यांच्‍या पेढीवर १२ नगाच्‍या ४० बॉक्‍सची आवक झाली. लिलावामध्‍ये प्रसाद वळंजू यांनी २५०० रुपये दराने प्रतिबॉक्‍सची खरेदी केली.

दरम्यान कोकणातून रोपे नेत तामिळनाडूत केलेला हापूस आंब्‍याचा प्रयोग यशस्‍वी झाला आहे.

सिंधूदूर्गचा देवगड आणि रत्‍नागिरीचा रत्‍नागिरी हापूस आंबा जगप्रसिध्‍द आहे. मात्र आता कोकणातून हापूस आंब्‍याची रोपे नेेवून परराज्‍यासह परदेशातही आंब्‍याच्‍या बागांची लागवड केली जात आहे. तामिळनाडूमध्‍येही अशाच पध्‍दतीने कोकणातून काही वर्षांपुर्वी हापूस आंब्‍याची रोपे नेवून लागवड केली होती. या प्रयोगाला यश आले असून आता तामिळनाडूतून प्रतिवर्षी ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्‍यांत हापूस आंब्‍याची आवक होते.

डिसेंबरमध्‍ये आफ्रीकेवरुन येणार हापूस

तामिळनाडूप्रमाणेच दक्षिण अफ्रीकेमधील एका शेतकर्‍याने कोकणातून हापूस आंब्‍याची रोपे नेेवून लागवड केली होती. संबधित शेतकर्‍याच्‍या प्रयोगाला यश आले असून डिसेंबर व जानेवारी महिन्‍यात दक्षिण अफ्रीकेवरुनही भारतात हापूस आंब्‍याची आवक होवू लागली आहे. अफ्रीकेवरुन येणारा आंबा `मलावी` या नावाने ओळखला जातो.

प्रसाद वळंजू, आंबा व्‍यापारीतामिळनाडूहून कोल्‍हापूर बाजार समितीमध्‍ये आलेला हापूस आंबा हा उत्तम दर्जाचा आहे. तसेच द. अफ्रीकेवरुन येणारा हापूस आंबाही गुणवत्तापूर्ण आहे. हे प्रयोग यशस्‍वी झाल्‍यामुळे कोकणचा हंगाम वगळता ऑक्‍टोबर ते जानेवारी दरम्यानही बाजारपेठेत हापूस आंबा उपलब्‍ध होत आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.