भाजपचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांनी मांडला ठराव; ठाकरे शिवसेनेचे गटनेते विजयसिंह शिंदे आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत यांचे अनुमोदन
पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि मावळ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेत ठराव मांडण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य श्री. शिवाजी बुचडे पाटील यांनी हा ठराव मांडला. ठाकरे शिवसेनेचे गटनेते श्री. विजयसिंह शिंदे आणि पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य श्री. संतोष राऊत यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. त्यानंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
मुळशी आणि मावळ तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतीचे नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर हा विषय जिल्हा परिषदेत मांडण्यात आला.
दोन्ही तालुक्यांतील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत व आवश्यक सवलती मिळाव्यात, तसेच पाणीटंचाईच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, या उद्देशाने मुळशी आणि मावळ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली.
भाजपचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांनी मांडलेल्या या ठरावाला ठाकरे शिवसेनेचे गटनेते विजयसिंह शिंदे आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत यांनी अनुमोदन दिले. सभागृहात हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
आता राज्य शासनाने या ठरावाची दखल घेऊन दोन्ही तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि शेतकरी व नागरिकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार शासन स्तरावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि मुळशी व मावळ तालुक्यांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.