आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा

नितीन देशपांडे   18   20-10-2026 15:10:05

Pune 

मी तीन वर्षाच्या काळात कुणालाही स्वत:हून बोललेलो नाही. जो जो नेता, जो पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, तो नेता 2029 ला निवडून येऊ द्यायचा नाही, असे म्हणत जरांगे पाटलांनी बीडमधील (Beed) नारायणगडावरुन राजकीय नेत्यांना थेट इशारा दिला.

नारायण गडावर आज मनोज जरांगे पाटलांचा (Manoj Jarange) दसरा मेळावा होत असून दुसरीकडे पाथर्डीतील भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे, बीड जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जो आपल्यासाठी नाही, तो आपला नाही, 2029 साठी सगळे तयार आहेत का? असे म्हणत जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना आवाहन केले.

समाजाचं दुख: एकायचं शिका, ऊन, वारा, पाऊस कशासाठी सहन करतो. गेल्या तीन वर्षांपासून समाज संघर्ष करतोय. समाज आणि समाजाची लेकरं बाळं महत्वाची आहेत. समाज उन्हा तान्हात झटतोय, भान ठेवायचं शिका. पक्ष आणि नेता मोठा करण्यासाठी लोकांचा जीव जातोय. कोणत्याही पक्षातील मराठा नेता असू द्या त्याच्यावर संकट आलं तर समाज त्यांच्यावर पांघरुण टाकतो, असे म्हणत जरांगे पाटलांनी मराठा नेत्यांनाही आपल्या भाषणातून लक्ष्य केलं. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या तरी अर्ज स्विकारला जात नाही, प्रमाणपत्र देत नाहीत. व्हॅलिडीटी प्रमाणपत्र देत नाहीत. एसीबीसीचं आरक्षण देत नाहीत, कोणता अधिकारी देत नाही ते बघतोच आता, असे म्हणत जरांगे पाटलांनी नारायण गडावरुन सरकारला इशारा दिला. मी शब्दाला पक्का आहे, तीन महिने तुम्हाला काही बोलत नाही म्हणालो. तुम्हाला कुठे जायचं नाही आणि मलाही नाही. आपण त्यांना शब्द दिलाय. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करू, तीन महिन्यांमधील एक महिना गेला, असेही त्यांनी म्हटले.

तुमच्या नेत्यांवरील प्रेम बास करा

नुसती गर्दी भागणार नाही, त्यांना वाटत होतं आम्ही, म्हणजे आम्ही सगळे तुमच्या जिवावर आहोत का? असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. सध्या राज्यावर दुष्काळाचं सावट आहे, भानावर या, तुमच्या नेत्यांवरील प्रेम बास करा. किती दिवस त्यांचा उधो उधो करणार तुम्ही. 80 टक्के शेतकरी आहे, शेतीत पिकलं नाही तर तो जगूच शकत नाही. जर तुमच्या घरात एखादा नोकरीवर असता तर पोरगं आम्हाला पैसे पाठवून देईल. पण आहे का आधार, तशी स्थिती नाही, असे म्हणत दुष्काळामुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाल्याकडे जरांगे पाटलांनी लक्ष्य वेधले.

जरांगेंनी 5 हजारांचं गणित मांडलं

शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्यांची लढाई आपल्याला सगळ्यांना एकत्र लढायची आहे. भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी दोन महिन्यांनी भयानक परिस्थिती होणार आहे. पाणी मागितलं तर एकमेकांना द्या, एकमेकांची मजा बघू नका. मी शेतकरी संघटना, कृषी तज्ज्ञांना एकत्र बोलवतो. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत घ्यायची, अशी मागणीही जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून केली. शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले, पाच हजार. पाच हजार यांनी मदत दिली, जरी दिले तर आठ दिवस हेलपाटे घालण्यात जातील. 200 रुपये पेट्रोलचे एकूण 2 हजार जाणार, जेवणाचे 3200 रुपये जाणार, असे म्हणत जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांना देऊ केलेल्या 5000 रुपयांच्या मदतीचे गणितच मांडले. दरम्यान, जीएसटी भरायचा आपण आणि बंगले यांचे मोठे झाले. समाजावर आज संकट आलंय, मर्द असाल तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहाल. आपल्यावर वाईट संकट आलय, असे म्हणत जरांगे पाटलांनी 5 प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या आहेत.

मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या

1 सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत दिलीचे पाहिजे
2 शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी मिळावी
3 पिक विम्याचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे
4 शेतकऱ्यांचं रखडलेलं अनुदान सगळं घ्यायचं
5 चारा छावण्या गावा-गावात उभ्या करा

मला भेटायला पैसे लागत नाहीत

सरकराच्या आडमुठ्या धोरणामुळेच सध्या हे सगळं सुरु आहे, त्याची धोरणं बदलली पाहिजे. मला आज कोणावर टिका करायची नाही. तीन वर्षात माझ्या जवळचे किंवा लांबचे पैसे घेतायत असे आरोप केले जात आहेत. तेव्हा मिडियाच्या साक्षीने बोलतो, मला कळाल्यावर मी सोडत नाही, मला भेटायला पैसे लागत नाही, असे म्हणत जरांगे पाटलांनी आपल्या नावावर कोणी पैसे मागत असेल तर त्यांनाही इशारा दिला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.