Pune
फडणवीस आपल्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतात.नुकताच त्यांचा गरबा नाईटमधील लाल लेहेंग्यातील सुंदर लूक समोर आला आहे. त्यांच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
बॉलिवूडमधील सेलिब्रिटी असोत किंवा राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे, त्यांच्या फॅशन स्टाइलची नेहमीच चर्चा होत असते. अमृता फडणवीस यांच्याबाबतीतही असेच पाहायला मिळते. आपल्या व्यक्तिमत्त्वासोबतच हटके फॅशन सेन्समुळे त्या नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. पारंपरिक साडी असो किंवा एखादा आकर्षक एथनिक आउटफिट, प्रत्येक लूकमध्ये त्या आपल्या स्टाइलची खास छाप पाडतात. नुकताच त्यांचा लाल रंगाच्या सुंदर लेहेंग्यातील लूक चर्चेत आला आहे. गरबा नाईटसाठी त्यांनी परिधान केलेल्या या आकर्षक आउटफिटमधील त्यांचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या हा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (फोटो सौजन्य :- @ssbyseemasingh, @amruta.fadnavis)लाल लेहेंग्यात अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज
सणासुदीच्या दिवसांत लाल रंगाच्या पारंपरिक कपड्यांची खास क्रेझ पाहायला मिळते. अमृता फडणवीस यांनी गरबा नाईटसाठी लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला असून, या लूकमध्ये त्यांचा ग्लॅमरस आणि क्लासी अंदाज पाहायला मिळत आहे. लाल रंगाच्या या आकर्षक आउटफिटमुळे त्यांच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पारंपरिक लूकला स्टायलिश टच देत त्यांनी आपल्या फॅशन सेन्सची खास झलक दाखवली आहे. गरबा नाईटसाठी त्यांची ही हटके स्टाइल सध्या लक्ष वेधून घेत आहे.
अमृता फडणवीस यांनी लाल लेहेंग्यासोबत सिंपल मेकअप केला आहे. हलक्या मेकअपमुळे त्यांचा लूक अधिक सुंदर दिसत आहे. त्यांच्या मेकअपमध्ये साधेपणा पाहायला मिळतो. लाल लेहेंगा, गोल्डन दागिने आणि सिंपल मेकअप यामुळे त्यांचा पारंपरिक लूक छान खुलून दिसत आहे.