आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

महात्मा फुलेंना प्रेरणा देणाऱ्या 'सिंथिया फरार' यांच्या समाधीचा तब्बल दीडशे वर्षांनंतर शोध लागला.

नितीन देशपांडे   288   17-10-2026 16:58:32

Pune मिसेस सिंथिया फरार… अठराव्या शतकात, जेव्हा मुलींच्या शिक्षणाला भारतीय समाजात मान्यता नव्हती, त्या काळात स्त्रीशिक्षणाचा विचार रुजवण्यासाठी त्यांनी अहमदनगरमध्ये केलेले कार्य अत्यंत मोलाचे होते. इतकेच नव्हे तर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या स्त्रीशिक्षण चळवळीशी सिंथिया फरार यांचा ऐतिहासिक संबंध होता.

 

काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या या स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्तीची समाधी अहिल्यानगरच्या बुऱ्हाणनगर येथील ख्रिस्ती स्मशानभूमीत शेकडो कबरींमध्ये शोध घेत असताना बोरीच्या झाडाखाली नजरेस पडली आणि इतिहासाचा एक हरवलेला दुवा पुन्हा सापडला.

 

सिंथिया फरार यांच्या समाधीचा शोध घेण्यासाठी इतिहासप्रेमी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र आता हा शोध संपला असून अहिल्या नगर येथील दमडी मशीद परिसरातील बुऱ्हाणनगर रस्त्यालगत असलेल्या सेंट सेवियर्स दफनभूमीत त्यांच्या कबरीचा शोध लागला आहे.

 

दीडशे वर्षांनंतर सिंथिया फरार यांच्या समाधीचा शोध...

 

महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मिसेस सिंथिया फरार यांच्या समाधीचा शोध अहिल्यानगरमध्ये लागला. अहिल्यानगर येथील इतिहासप्रेमी अभिजित एकनाथ वाघ, पत्रकार भैरवनाथ वाकळे आणि आसिफ खान दुले खान यांनी बुऱ्हाणनगर येथील ख्रिश्चन दफनभूमीत शोधमोहीम राबवून ही ऐतिहासिक समाधी शोधून काढली. ही समाधी नेमकी कशी शोधली, हे सांगताना पत्रकार भैरवनाथ वाकडे म्हणतात,

मिसेस सिंथिया फरार यांच्या समाधीचा शोध घेण्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतो. मात्र समाधी काही सापडत नव्हती. काल (शुक्रवारी) सकाळी आम्ही बुऱ्हाणनगर रस्त्यावरील ख्रिश्चन दफनभूमीत पोहोचलो. तेथे शेकडो कबरी असल्याने प्रत्येक कबरीवरील नाव, जन्म-मृत्यूच्या तारखा आणि उपलब्ध माहिती तपासत आम्ही शोध सुरू केला. दफनभूमीच्या विविध भागांत पाहणी करूनही समाधी सापडत नव्हती. अचानक तेथील बोरीच्या झाडाखाली असलेली एक कबर दिसली, ज्यावर लिहिलं होतं,


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.