आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवणार, आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर;

शिंदे राम   63   14-10-2026 12:37:48

Pune 

आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.

सुरुवातीला २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. त्यात आता आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसंच शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी आधी अग्रीम मदत म्हणून दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार रुपये पाठवले जाणार आहेत असंही त्यांनी सांगितलं.

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. सुरुवातीला आपण २६५ तालुक्यात दुष्काळ घोषित केला होता. काही तालुक्यात तक्रारी होत्या. आता ट्रिगर १ आणि ट्रिगर २ चा आढावा घेऊन ३०५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय. ४० तालुके वाढले आहेत. बहुतांश महाराष्ट्र, ज्या भागात शेतकरी दुष्काळाने होरपळला होता त्या भागाला दुष्काळाच्या १२ सवलती देण्याचा निर्णय घेतलाय.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दुष्काळामुळे शेतकऱ्यांसाठी दिवाळी अडचणीची आहे. त्यामुळे मदत आणि कार्यप्रणाली जी पूर्ण करावी लागते ती दिवाळीच्या आधी होणं कठीण आहेत. कायद्याने दिलेल्या तारखांमुळे दिवाळीच्या आधी पूर्ण होऊ शकत नाही. पण परिस्थिती विचारात घेता दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी एकत्रित बसून चर्चा केली. पुढच्या काळात शेतकऱ्यांना जी मदत करायची आहे ती करू, पण त्यात अग्रीम म्हणून ५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीआधी देण्याचा निर्णय घेतलाय.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.