PUNE
आता मक्खी जनता पार्टीची एन्ट्री झाली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी माशा मारण्यासाठी हातोडा वापरता येत नाही, असा वाकप्रचार वापरला होता. त्यानंतर सोशल मीडियावर लगेचच मक्खी जनता पार्टीची स्थापना करण्यात आली आहे.
या पार्टीला जेनजीचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे अभिजीत दीपकेंना नवीन पर्याय मिळाला की या नव्या पक्षाचा संस्थापक दीपकेंना पुरक काम करणार? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
मक्खी जनता पार्टी (एमजेपी)च्या दाव्यानुसार 72 तासात इन्स्टाग्रामवर 40 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तर 3.3 लाखाहून अधिक फॉलोअर्स झाले आहे. या संघटनेच्या पेजवर आर्यन नावाचा विद्यार्थी या संघटनेचा संस्थापक असल्याचं दिसून येत आहे. आम्ही संघटनेच्या प्रवक्त्याच्या शोधात आहोत, असं या संघटनेच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीत म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे अकाऊंट जून 2021 मध्ये बनवण्यात आलं होतं. आता त्याचं नाव 'makhijantaparty.ig' करण्यात आलं आहे. या पूर्वी या पेजचं नाव आठवेळा बदलण्यात आल्याचंही दिसून आलं आहे.
,