आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बीड

सुप्रिया सुळे यांच्या जावयाच्या कंपनीला 1200 एकर सरकारी जमीन,

नितीन देशपांडे   280   08-10-2026 18:18:27

Pune 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या जावयाच्या कंपनीला 1200 एकर सरकारी जमीन देण्याचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे.

त्यांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केले आहेत. सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीला १२०० एकर जमीन ? वाचून धक्काच बसला. दोन आठवड्यात दोन जीआर आहेत. त्यामुळे आता काही अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतात, असं दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान निविदा का नाही ? १२०० एकर सरकारी जमीन, कोट्यवधींचा व्यवहार, मग निविदा का टाळली? स्पर्धा झाली असती तर जास्त भाडे मिळालं नसते का? जूनमध्ये ही जमीन महाऊर्जामार्फत सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर ग्रीन एनर्जी पार्कसाठी देण्याचा निर्णय झाला होता. मग अवघ्या तीन महिन्यांत, सप्टेंबरमध्ये, तीच १२०० एकर जमीन थेट एकाच खासगी कंपनीला का? हा बदल कोणाच्या सांगण्यावरून झाला? जीआरमध्ये याचे एकही कारण नाही! असे काही प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी देखील अंजली दमानिया यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जोरदार पलटवार केला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होत्या. या मेळाव्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांची देखील उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझा जावई काय करतो? हा त्याचा प्रश्न मी त्याच्यावरती कसं बोलणार? अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांवर दिली आहे.

दरम्यान महिलांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊन देशाच्या उन्नतीमध्ये योगदान दिलं पाहिजे. महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार साहेबांनी घेतला, त्यामुळे महिला सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर झाल्या. मुंबईच्या महापौरपदावर महिला विराजमान होण्यामागे देखील शरद पवार साहेबांचाच निर्णय आहे. महिलांना सत्तेत बसण्याची संधी शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे मिळाली, असंही यावेळी सुप्रीया सुळे यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत महिला आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी का झाली नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.