Pune
बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज तब्बल तीन तास जोरदार सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान वाझे यांच्याकडे असलेल्या अफाट संपत्तीवर आणि आलिशान गाड्यांच्या ताफ्यावर न्यायालयाने तीव्र आश्चर्य व्यक्त करत तपास यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
सकाळच्या सत्रात तब्बल ३ तास चाललेल्या या वादळी सुनावणीनंतर न्यायालयाने कामकाज स्थगित केले असून, दुपारी जामीन अर्जावर पुन्हा पुढील सुनावणी होणार आहे. दुपारी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एपीआयकडे मर्सिडीज, पण आयुक्तांकडे नाही
सुनावणीदरम्यान सचिन वाझे वापरत असलेल्या महागड्या गाड्यांचा विषय निघाल्यानंतर न्यायमूर्तींनी कडक शब्दांत ताशेरे ओढले
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी: ते मर्सिडीज गाडीतून आले, हे सगळे कुठून आले? ते मर्सिडीज वापरत होते हे तुमच्या रेकॉर्डवर आले आहे का? एका एपीआयच्या मालकीची मर्सिडीज आहे?
सॉलिसिटर जनरल: होय, एका एपीआयच्या मालकीची मर्सिडीज आहे, पण खुद्द पोलीस आयुक्तांकडेही (CP) स्वतःच्या मालकीची मर्सिडीज नाही.
न्यायमूर्ती कुलकर्णी: एका एपीआयच्या मालकीची मर्सिडीज असणे, ही पोलीस आयुक्तांसाठी अतिशय चिंतेची आणि गंभीर बाब असायला हवी.
यावेळी न्यायालयाने एका साक्षीदाराच्या जबाबाचा उल्लेख करत सांगितले की, सचिन वाझे हे दुसऱ्या गेटवरून मर्सिडीज गाडीने थेट मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात येत असत आणि तिथून थेट 'वर्षा' बंगल्यावरही जात.
महिना 90 हजार पगार अन् गाड्यांचा ताफा
न्यायालयाने वाझे यांच्या अधिकृत उत्पन्नाबाबत विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर आ