आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Nana Patekar: मोठी बातमी! जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

नितीन देशपांडे   256   08-10-2026 08:20:52

Pune 

अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन झाल्याची माहिती आहे. नाना यांच्या अकाली एक्झिटने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर म्हणजेच नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतील हे एक दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू करत त्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि खास शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या गुणी अभिनेत्यांमध्ये नाना पाटेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.

रंगभूमीपासून सिनेमापर्यंतचा प्रवास

नाना पाटेकर यांच्या अभिनयाची सुरुवात रंगभूमीपासून झाली. त्यांच्या अभिनयाची खरी जडणघडण मराठी रंगभूमीवरच झाली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गमन' या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली

यानंतरच्या काळात नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. हळूहळू त्यांच्या अभिनयाची वेगळी शैली प्रेक्षकांच्या लक्षात येऊ लागली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.