आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पिरंगुट घाट अपघातात कासार आंबोलीतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; मृतांची संख्या २ वर

शरद लाटे  128   07-10-2026 11:36:29

पिरंगुट/मुळशी प्रतिनिधी : पिरंगुट येथील पुणे-कोलाड महामार्गावर शनिवारी (३ ऑक्टोबर) झालेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमी तरुणाचा मंगळवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कासार आंबोली गावावर शोककळा पसरली आहे.

लवळे फाटा येथील श्रीपाद हॉटेलसमोर शनिवारी सकाळी सिमेंट ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत लक्ष्मण कुबल यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर कासार आंबोली येथील नितीन बाळासाहेब भिलारे (वय ३२) हे गंभीर जखमी झाले होते.

नितीन भिलारे यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात शर्थीचे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कासार आंबोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता दोन झाली असून, पिरंगुट घाटातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर अवजड वाहनांची तपासणी, वाहनांची तांत्रिक स्थिती आणि वाहतूक सुरक्षेबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कासार आंबोलीतील नितीन भिलारे यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.