आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

कातरखडक जिल्हा परिषद शाळेला सभापती शेळकेंची अचानक भेट

नितीन देशपांडे   213   06-10-2026 19:52:09

मुळशी प्रतिनिधी : मुळशी तालुक्यातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान पंचायत समिती मुळशीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी कातरखडक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अचानक भेट देत शाळेची पाहणी केली.

यावेळी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या पत्नी तथा पंचायत समिती मुळशीच्या माजी उपसभापती सारिकाताई मांडेकर उपस्थित होत्या. दोन्ही मान्यवरांनी शाळेतील शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच उपलब्ध शैक्षणिक सुविधांची माहिती घेतली. पाहणीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचीही माहिती जाणून घेतली.

शाळेच्या वतीने शिक्षिका स्वाती पंडित यांनी शाळेतील विविध उपक्रम, शैक्षणिक कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती मान्यवरांना दिली. शाळेतील शैक्षणिक उपक्रम व शिक्षकांच्या कार्याचे यावेळी मान्यवरांनी कौतुक केले.

शाळेच्या विकासामध्ये ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्या सहभागाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच, गावातील प्रमुख पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ तसेच पालक उपस्थित होते. शाळेच्या वतीने मंदाताई शेळके व सारिकाताई मांडेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला.

शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेत, भविष्यातही शाळेच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका मान्यवरांनी व्यक्त केली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.