पुणे प्रतिनिधी -: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आज पुणे जिल्हा परिषदेचे ठाकरे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजयराजे शिंदे यांनी भेट घेत आपला पाठिंबा दिला.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सरकारवर सळसळून टीका केली,
यावेळी ते म्हणाले की पुणे जिल्हा परिषदेमध्ये देखील राईट टू एज्युकेशन RTE मध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला असून यावर आम्ही आवाज उठवला त्यानंतर हा घोटाळा फक्त पुण्यातच नसून सर्व महाराष्ट्रात झाला आहे असे सरकारच्या लक्षात आले त्याबद्दल आम्ही पाठीमागे लागतो व गरीबाचा हक्क आम्ही निश्चित लढत राहू व तुमच्यासोबत नेहमी कटीबद्ध राहू,
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, यासाठी आपण कोणती ठोस पावले उचलणार आहात? विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या सोबत राहून आंदोलनाला आवश्यक ती मदत आणि सहकार्य करण्याची आपली भूमिका काय असेल? तसेच पुणे जिल्हा परिषदेमधील RTE प्रवेशातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा राज्यभरात समोर आल्यानंतर गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी पुढील काळात कोणता लढा उभारणार आहात? यावेळी त्यांनी सवाल उपस्थित करत स्पष्ट केले की, MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या लढ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचाही पाठिंबा असून ते विद्यार्थ्यांच्या सोबत राहणार आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करण्याची भूमिका आम्ही घेतली असून, त्यांच्या हक्कांसाठी हा लढा पुढेही कायम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२ ऑक्टोबरपासून MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. परीक्षांमधील कथित पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, परीक्षा पद्धतीतील बदल, पारदर्शकतेचा अभाव आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी या प्रमुख मुद्द्यांवर विद्यार्थी आंदोलन करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या विविध परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट, चौकशी अहवाल सार्वजनिक करणे आणि प्रशासनिक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे.