आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांना निवडणूक आयोगाचा दणका;

शरद लाटे  317   03-10-2026 15:43:59

Pune 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीची जोरदार तयारी विविध पॅनलकडून चालू आहे.यातच सन २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणूक प्रचारात पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलकडून 'अजितदादा पवार' अथवा 'अजित पवार' यांचे नाव, छायाचित्र तसेच प्रतिमा यांचा वापर झाल्यास कारवाईचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिला आहे.

या संदर्भात अजितदादा पवार यांचे चिरंजिव जय पवार तसेच राजवर्धन शिंदे यांनी हरकत नोंदवली होती. त्या नंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुरुषोत्तम जगताप यांना लेखी पत्र देत निवडणूक निर्णय अधिका-यांच्या सूचनांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारामध्ये 'अजितदादा पवार' किंवा 'अजित पवार' यांचे नाव अथवा प्रतिमा असलेले फलक, बॅनर, पोस्टर्स, स्टिकर्स, पत्रके तसेच अन्य मुद्रित, इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रचार साहित्य वापरले जात असल्याबाबत जय अजितदादा पवार यांनी हरकत अर्ज सादर केला होता.

पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधितांना तात्काळ अशा प्रचार साहित्याचा वापर थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यापूर्वी वापरलेल्या साहित्याबाबत आवश्यक कार्यवाही करून त्याचा लेखी अनुपालन अहवाल कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रचार साहित्याबाबत आयोगाचे स्पष्ट निर्देश

• अजितदादा पवार यांच्या नावाचा अथवा प्रतिमेचा वापर असलेले फलक, बॅनर, पोस्टर्स, स्टिकर्स व पत्रके वापरणे थांबवावे.

• मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल प्रचार साहित्याबाबतही निर्देश लागू.

• यापूर्वी वापरलेल्या साहित्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

• केलेल्या कार्यवाहीचा लेखी अनुपालन अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सादर करावा.

• आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.