आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Dhananjay powar : '.तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'

Swati Jain   247   01-10-2026 18:18:42

Pune 

सायको रंगा' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगताना जान्हवीने कोल्हापुरात बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ केल्याचा किस्सा सांगितला होता.

तिच्या या वक्तव्याचा अर्थ कोल्हापुरातील पाणी खराब असल्याचे तिने म्हटल्याप्रमाणे घेतला जात असून, त्यावरून तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. या वादावर आता धनंजय पोवार उर्फ डीपी दादाने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत जान्हवीच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे म्हटले आहे. 'I Support Kolhapur' असे त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

धनंजय पोवार म्हणाला, "लोकांनी मला विचारलं की तुम्ही जान्हवीच्या बाजूने की कोल्हापूरच्या बाजूने? मी स्पष्ट सांगितलं की मी कोल्हापूरच्या बाजूने आहे. नात्यात ती मला दादा मानते आणि मी तिला बहीण मानतो." पुढे त्याने म्हटले की, जर जान्हवीकडून खरंच कोल्हापूरविरोधात काही चुकीचे वक्तव्य झाले असते, तर त्याने स्वतः तिची कानउघाडणी केली असती.

समजा ती चुकली असेल, तर तिच्या कानाला धरून कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन, हेही तितकंच सत्य आहे. माझ्यात तेवढी धमक आहे. ती जर चुकली असती, तर मी तिला स्पष्ट सांगितलं असतं की तुझं चुकलंय, कोल्हापूरकरांची माफी माग. पण तिने तसं वाक्य वापरलेलं नाही,." असे धनंजय पोवारने म्हटले आहे.

दरम्यान, जान्हवीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असल्याबद्दलही धनंजय पोवारने नाराजी व्यक्त केली. विशेषतः तिच्या पतीबद्दल वापरल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह भाषेवर त्याने आक्षेप घेतला. तो म्हणाला "तिच्या नवऱ्याला तुम्ही 'काळं डुक्कर' म्हणालात, हे मला अजिबात आवडलं नाही. ही भाषा आपली नाही. 'कोल्हापूरचं पाणी खराब आहे' हे वाक्य तिच्याकडून आलेलं नाही. तिच्या त्वचेचा प्रॉब्लेम आहे," असे स्पष्टीकरण त्याने दिले. धनंजय पोवारची ही भूमिका आणि त्याची सोशल मीडिया शेअर केलेला व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.