आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

माण-भोईरवाडी परिसरात आधार सेवा व मतदार नोंदणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नितीन देशपांडे   144   28-09-2026 09:26:59

मुळशी प्रतिनिधी : मुळशी तालुक्यातील माण-भोईरवाडी परिसरातील फ्यूजन टॉवर सोसायटीत नागरिकांच्या सोयीसाठी आधार कार्ड सेवा तसेच नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा आपल्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात आणि त्यासाठी होणारी गैरसोय टाळता यावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष निलेश भोईर यांनी केले. शिबिरामध्ये सोसायटीतील रहिवासी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आधार कार्डशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेतला.

तसेच फ्यूजन टॉवर सोसायटी, टिन्सेल काऊंटी सोसायटी, कोहिनूर कोरल सोसायटी, मेलेंज रेसिडेन्सी सोसायटी, लिमो सोसायटी आणि ३२ पाइनवूड सोसायटी यांसह विविध सोसायट्यांमधील नागरिकांसाठी नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादीतील दुरुस्तीचे काम करण्यात आले. यामध्ये नवीन मतदार म्हणून नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल तसेच इतर आवश्यक दुरुस्त्या करून घेण्यात आल्या.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या. नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी तसेच आवश्यक शासकीय सेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी फ्यूजन टॉवर सोसायटीचे चेअरमन चैतन्य मरे, सी-विंगचे सचिव राजेंद्र गारे, विजय सांगर, धनंजय कदम, महेंद्र गोडसे, पार्थो दत्ता रॉय, आशिष, कोहिनूर कोरल सोसायटीचे चेअरमन नामदेव जगताप, अनिल झा, ३२ पाइनवूड सोसायटीचे चेअरमन अंकित शहा, गौरव चड्ढा, अजय केदार, मेलेंज सोसायटीचे पदाधिकारी, लिमो सोसायटीचे चेअरमन सौरव सिंग, टिन्सेल काऊंटी सोसायटीचे सचिव अल्पेश शहा, अंकुश तुपे, योगेश वाडेकर, अनिल मोलक यांच्यासह विविध सोसायट्यांमधील नागरिक उपस्थित होते.

“या उपक्रमाला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. नागरिकांची गरज आणि मागणी लक्षात घेता भविष्यातही आधार कार्ड सेवा, मतदार नोंदणी तसेच इतर आवश्यक शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील,” असे आयोजक तथा भारतीय जनता पार्टीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष निलेश भोईर यांनी सांगितले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.