आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

गणेशम फेज २ सोसायटीत भीषण आग; दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका

नितीन देशपांडे   769   18-09-2026 18:01:19

पिंपरी-चिंचवड : गणेशम फेज २ सोसायटीमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले.

आगीच्या घटनेदरम्यान एका खोलीत दोन लहान मुली अडकल्या असल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करत दोन्ही चिमुरड्यांची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

श्री. शत्रुघ्न काटे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी व जवानांशी समन्वय साधत परिस्थितीची पाहणी केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने केलेल्या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला.

यावेळी नगरसेविका सौ. अनिताताई काटे आणि नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे यांच्यासह सोसायटीतील नागरिक, पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी कार्यवाही करण्यात आली. घटनेची पुढील चौकशी संबंधित प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

श्री. शत्रुघ्न काटे यांनी दाखवलेली तत्परता आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेले धाडसी बचावकार्य यामुळे दोन चिमुरड्यांचे प्राण वाचले आणि संभाव्य मोठी जीवितहानी टळली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.