आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune Beed Train: आजपासून धावणार पुणे-बीड ट्रेन! पाहा वेळ, थांबे अन् संपूर्ण टाइमटेबल!

शरद लाटे  521   17-09-2026 16:37:29

Pune Beed Train: आजपासून धावणार पुणे-बीड ट्रेन! पाहा वेळ, थांबे अन् संपूर्ण टाइमटेबल!

 

पुणे आणि बीडमधील प्रवाशांची गेली अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. या दोन्ही शहरांदरम्यान बहुप्रतीक्षित थेट रेल्वेसेवेचा शुभारंभ होत आहे. गुरुवारी 17 सप्टेबर रोजी बीड स्थानकावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून सेवा उद्‌घाटित केली जाणार आहे.

 

याप्रसंगी पुणे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. रेल्वे बोर्डाने बुधवारी रोजी या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या ट्रेनने आता अवघ्या 7 तासांत पुणे ते बीड हा प्रवास पूर्ण होणार आहे.

 

 

नोकरदार, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

 

ही रेल्वेसेवा दररोज चालवण्यात येणार असल्याने प्रवाशांची खूप मोठी सोय होणार आहे. या गाडीला 16 डबे असणार असून एकाच वेळी सुमारे 2,000 प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता यात असेल. यामुळे बीड आणि आसपासच्या भागातून पुण्याला येणारे नोकरदार, विद्यार्थी तसेच व्यापाऱ्यांचा प्रवास अधिक सोपा होणार आहे.

 

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या या नवीन रेल्वे लिंकमुळे मराठवाड्यात जाणाऱ्या सर्वच प्रवाशांना प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही दिशांचे नियोजन पुढीलप्रमाणे असेल.

 

पुणे ते बीड (गाडी क्र. 11433): ही गाडी पुण्याहून रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता बीडला पोहोचेल.

बीड ते पुणे (गाडी क्र. 11434): ही गाडी बीडहून रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी पुण्याला पोहोचेल.

या प्रमुख स्थानकांवर असेल थांबा

 

प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोहो, नवीन आष्टी आणि अमळनेर या स्थानकांवर थांबणार आहे.

 

नियमित व्यावसायिक सेवेची तारीख लवकरच

 

उद्‌घाटनाचा कार्यक्रम आज पार पडणार असला, तरी रेल्वे बोर्डाने अद्याप या गाडीच्या नियमित व्यावसायिक प्रवासाची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र, उद्‌घाटनानंतर लवकरच ही नियमित सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी पूर्णपणे खुली केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.