आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

सखी अंगण आकुर्डी येथील बचत गटांच्या गाळे वाटपात अनियमिततेचा आरोप; ई-टेंडरिंग प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणी

शरद लाटे  700   09-09-2026 15:30:50

पिंपरी-चिंचवड : समाज विकास विभागांतर्गत बचत गटांना देण्यात आलेल्या सखी अंगण, आकुर्डी येथील गाळे वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे युवक अध्यक्ष विकी रोहिदास पासोटे व सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ जावीर यांनी केला आहे.

गाळे वाटपाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली असता, काही बचत गटांच्या नावावर एकापेक्षा अधिक गाळे देण्यात आल्याचे, बचत गटांच्या नोंदणी तारखांमध्ये विसंगती आढळत असल्याचे तसेच भाडे व अनामत रकमेसंदर्भातही अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे पासोटे व जावीर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करून संबंधित बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी या प्रकरणाची तातडीने व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, गाळे वाटप प्रक्रियेची संपूर्ण Cross Verification करून प्रत्येक बचत गटाची पात्रता, कागदपत्रे, नोंदणी तारीख, गाळ्यांची संख्या, भाडे व अनामत रक्कम यांची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गाळे वाटपातील पारदर्शकता व समान संधी सुनिश्चित करण्यासाठी सध्याची ई-टेंडरिंग प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविण्यात यावी, अशीही मागणी विकी पासोटे व आदिनाथ जावीर यांनी केली आहे.

चौकशीदरम्यान अनियमितता किंवा नियमबाह्य प्रक्रिया झाल्याचे निष्पन्न झाल्यास, दोषी आढळणारे संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा अन्य व्यक्तींवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकरणात प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करून संपूर्ण गाळे वाटप प्रक्रिया पारदर्शक करावी, अशी भूमिका पासोटे व जावीर यांनी व्यक्त केली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 लोकांच्या प्रतिक्रिया


PCMC तहलका
स्वाती सुखराज पवार 10-09-2026 13:58:33

मला शॉप घ्यायचा आहे

PCMC तहलका
स्वाती सुखराज पवार 10-09-2026 13:59:54

मातृ शक्ती महिला बचत गट

PCMC तहलका
स्वाती सुखराज पवार 10-09-2026 13:59:54

मातृ शक्ती महिला बचत गट

PCMC तहलका
स्वाती सुखराज पवार 10-09-2026 13:59:55

मातृ शक्ती महिला बचत गट

PCMC तहलका
स्वाती सुखराज पवार 10-09-2026 13:59:56

मातृ शक्ती महिला बचत गट


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.