आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुण्यात DJ अंगावर कोसळून सलमा सलाउद्दीन पठाण यांचा मृत्यू;

शरद लाटे  451   05-09-2026 21:05:10

Pune 

पुण्यामध्ये डीजे लावण्यावरुन मोठा गोंधळ सुरु आहे. पुण्यात DJ ला विरोध होत असताना दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये याच डीजेने एका महिलेचा बळी घेतला आहे. डीजे अंगावर कोसळून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणात आता धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या जुनी सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान अत्यंत धक्कादायक घटना घडली. डीजे अंगावर कोसळून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली. ऐन उत्सवात महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्याच्या जुन्या सांगवीत दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ज्या 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या महिलेचे नाव सलमा सलाउद्दीन पठाण असं आहे. रात्री विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं. यावेळी अचानक लोखंडी भाग सलमा यांच्या डोक्यावर पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, मृत महिलेचा मुलगा मंडळात असल्याने कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे. इतर मुलं अडचणीत येऊ नयेत, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली असून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करू नये, अशीही विनंती करण्यात आली आहे. या घटनेनं जुन्या सांगवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सलमा सलाउद्दीन पठाण या पती सलाउद्दीनसह दहीहंडी पहायला आल्या होत्या. त्यांचा मुलगा रहीम पठाण हा विघ्नहर्ता मंडळा कार्यकर्ता आहे. मंडळातील सर्व मुलं आपलीच आहेत. कुणालाही अडचण येऊ नये यासाठी सलाउद्दीन यांनी पोलिसांत तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सलमा सलाउद्दीन पठाण यांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती सागंवी पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जितेंद्र कोळी यांनी दिली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.