आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 धुळे

मध्यरात्री प्रसिद्ध रीलस्टारला पोलिसांनी उचललं; अटकेचा LIVE व्हिडिओ समोर

Swati Jain   67   03-09-2026 10:25:07

Pune 

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार संतोष पंडित यांना मध्यरात्री एक वाजता अटक करण्यात आली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केल्याप्रकरणी संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

मध्यरात्री एक वाजता पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संतोष पंडित यांना अटक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह असलेला व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी संतोष पंडित यांना चांगलेच महागात पडले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर तसेच व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, सारिका कांबळे या महिलेने ही तक्रार दिली आहे.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने 'संतोष पंडित 6278' या यूट्यूब अकाउंटवरून चंद्रकांत पाटील व मिताली साळवेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूर आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या पोस्ट व व्हिडिओंमुळे बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, संबंधित पोस्टला मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळाल्याचेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

मध्यरात्री कारवाई अन् अटकेचा व्हिडिओ व्हायरल

गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याच्या डेक्कन पोलिसांनी तातडीने पावले उचलली. मध्यरात्री सुमारे १ वाजता पोलिसांचे पथक संतोष पंडित यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घरातून ताब्यात घेतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.