आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

अभिनेता मनोज वाजपेयींची मुळशीत मोठी गुंतवणूक; 4.45 एकर जमीन खरेदी

शरद लाटे  61   29-08-2026 12:40:02

Pune 

बॉलिवूडसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरील दिग्गज अभिनेता मनोज वाजपेयी याने पुण्याजवळील निसर्गरम्य मुळशी तालुक्यात मोठी रिअल इस्टेट गुंतवणूक केली आहे. 'सीआरई मॅट्रिक्स'च्या अहवालानुसार, वाजपेयी यांनी लोणावळ्यापासून जवळ असलेल्या मुळशी येथे १.८० हेक्टर म्हणजेच सुमारे ४.४५ एकर शेतजमीन खरेदी केली आहे.

या जमिनीच्या खरेदीसाठी मनोज वाजपेयीने १ कोटी ३७ लाख ३१ हजार रुपये मोजले आहेत. ही शेतजमीन त्यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी विमलचंद खिमराज जैन यांच्याकडून खरेदी केली असून या व्यवहारासाठी ६ लाख ८६ हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे.

यापूर्वी २०२३ मध्येही मनोज वाजपेयीने मुंबईतील ओशिवरा भागात रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याने ओशिवरामधील वीरा देसाई रोडवरील 'सिग्नेचर बिल्डिंग'मध्ये ३२ कोटी रुपयांना चार व्यावसायिक ऑफिस युनिट्स खरेदी केले होते, ज्यासाठी त्यांनी १.८६ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले होते.

दरम्यान, मनोज वाजपेयीचा आगामी 'लास्ट मॅन इन टॉवर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ११ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. बेन रेखी दिग्दर्शित आणि राणा दग्गुबाती यांच्या 'स्पिरिट मीडिया' निर्मित हा चित्रपट प्रसिद्ध लेखक अरविंद अडिगा यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मनोज वाजपेयी आणि बोमन इराणी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.