आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचे मोठे पाऊल

नितीन देशपांडे   709   25-08-2026 10:45:23

Pune 

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर परस्परांवर टोकाची टीका करणारे दोन्ही गट आता पुन्हा एकत्र येणार का?

या चर्चेने जोर धरला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत 'कोअर कमिटी'ची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणावर (Merger) सविस्तर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात नुकतीच बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करणे टाळणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठका या सर्व पार्श्वभूमीवर राजकारणात पुन्हा एका मोठ्या 'रि-युनियन'ची स्क्रिप्ट लिहली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी तळागाळातील कार्यकर्त्यांचीही हीच इच्छा असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच २९ ऑगस्टच्या या बैठकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

पक्षाच्या पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) अध्यक्ष शरद पवार यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. ज्येष्ठ नेते पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आणि पार्थ पवार यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीनंतर, विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली.

पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) मधील ज्येष्ठ नेते आता दुसऱ्या गटातील सदस्यांशी संवाद साधण्यास तयार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यापूर्वी म्हटले होते की, पक्षाचे सदस्य विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार नाहीत. "२०२९ च्या निवडणुकांपूर्वी राज्यात गमावलेली पकड पुन्हा मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. तळागाळातील अनेक कार्यकर्त्यांचा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस (सपा)च्या दुसऱ्या गटात विलीनीकरणाच्या बाजूने होता. पक्षाच्या नेतृत्वाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे," असे राष्ट्रवादी काँग्रेस (सपा)च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सपा) काही पदाधिकाऱ्यांच्या मते, येत्या काही दिवसांत राज्यात काही मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या भेटींमुळे या विषयांवर चर्चा सुरू झाली आहे. पक्षात फूट पडल्यापासून एकमेकांवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आता एकमेकांवर टीका करणे टाळत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.