आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

भाजपात मोठा फेरबदल, नव्या कार्यकारिणीची घोषणा, महाराष्ट्रातील 5 नेत्यांना मोठी संधी!

Swati Jain   782   17-08-2026 17:05:57

Pune 

भाजपात अनेक घडामोडी घडत आहेत. केंद्रातील मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. पडद्यामागे तशा हालचाली केल्या जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

या सर्व घडामोडी घडत असतानाच आता राजधानी दिल्लीतून मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भाजपाने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले आहेत. या फेरबदलात महाराष्ट्रातील भाजपाच्या चार नेत्यांन मोठी संधी देण्यात आली आहे. त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वात ही नवी कार्यकारिणी काम करेल. आताच्या घोषणेनुसार माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर वर्णी लागलेली आहे. मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्री पदावर फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील खासदार विनोद तावडे राष्ट्रीय महामंत्री व केंद्रीय मंत्री पियुष गोयल कोषाध्यक्षपदी कायम असतील.सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून प्रिती गांधी यांना संधी देण्यात आली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.