Pune
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलाच्या हालचालींना वेग आला असून रिक्त असलेल्या मुंबई अध्यक्षपदासाठी आमदार झिशान सिद्दीकी यांचे नाव शर्यतीत आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मात्र, या संभाव्य निवडीमुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये पार्थ पवार विशेष रस घेत आहेत. आपल्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू असलेल्या झिशान सिद्दीकी यांच्याकडेच मुंबई राष्ट्रवादीची धुरा सोपवावी, यासाठी पार्थ पवार पक्षांतर्गत कमालीचे आग्रही असल्याचे समजते. समीर भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई अध्यक्षपद दीर्घकाळापासून रिक्त आहे.
पक्षातूनच विरोधाचा सूर आणि नवाब मलिक कॅम्पची नाराजी
झिशान सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. एकच व्यक्तीला वारंवार संधी?काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या वाट्याला आलेल्या एकमेव जागेवरून झिशान सिद्दीकी यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता लागलीच मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहराचे अध्यक्षपदही त्यांच्याकडेच सोपवण्याच्या हालचाली सुरू असल्याने पक्षातील निष्ठावंत आणि इतर इच्छुक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.