Pune
भुमरेमामा (Sandipanrao Bhumre) तुम्ही सहाव्या नंबरवर होता. तुम्हाला निवडून आणण्यासाठी मराठ्यांच्या पोरांनी काम केलं. पण तुम्ही आमचाच मामा करायला निघाला. तुम्ही मराठ्यांचं नुकसान करणार असाल तर शिंदेंच्या सगळ्या सीट आम्ही पाडणार.
शिंदे साहेबांची मी इतकी सीट पाडणार की त्यांना आयुष्यात पश्चाताप होईल, झोपून टाकील मी सगळे सीट. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपण जीवाभावाचे आहात. त्यातून आम्ही तुमचं काम करत होतो. पण तुम्ही माझ्याचविरोधात फिरलात. तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण तुम्ही धोका दिला. असा घणाघाती आरोप करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Manoj Jarange Patil on Kunbi Certificate Issues)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला (Maratha Reservation) मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला झाला. मात्र आता त्याच प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलंय. मराठवाड्यात (Marathwada) कुणबी जातीचे प्रमाणपत्र (Kunbi Certificate) मिळवलेल्या चार मराठा (Maratha) महिला लोकप्रतिनिधींची जात वैधता (Caste Validity) पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शरद पवार साहेब म्हातारे झाले आहेत. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनामराठे तुटून मतदान करत होते. शिंदे साहेब तुम्ही उपकाराची परतफेड करालअसंवाटलंहोते. आम्हीझोकूनकामकेलं. निवडणुकीला तुमच्याकडून कुणी पैसे घेतले असतील तर दाखवून द्या. फडणवीस साहेब मराठ्यांच्या जीवावर सत्तेत बसले आहेत. त्यामुळे सगळं बाहेर काढायला लावू नका, असाइशारादेखीलमनोजजरांगेयांनीसरकारलादिलाआहे. एकनाथ शिंदेंसाठी आम्ही खूप खस्ता खाल्ल्यात, पण तुम्ही तर आमची नरडी कापायला लागला. तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो. पण तुम्ही सत्तेत गेलात म्हणून आमच्यावर माज उतरावणार का? शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळतात का? आता उद्धव ठाकरे बरा म्हणायची वेळ आलीय. असेहीमनोजजरांगेम्हणाले.