आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Talathi Bharti 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MPSC ची तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध;

शरद लाटे  296   23-07-2026 13:42:06

Pune 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो परीक्षार्थी आणि उमेदवारांसाठी एक अत्यंत दिलासादायक व महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६' च्या पदसंख्येत मोठी वाढ जाहीर केली असून, यामुळे भरती प्रक्रियेतील एकूण पदांची संख्या आता थेट ५ हजार ७०७ वर पोहोचली आहे.

नवीन शुद्धिपत्रकानुसार विविध विभागांतील खालील महत्त्वाच्या पदांचा या संयुक्त परीक्षेत समावेश करण्यात आला आहे:
१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (महसूल व वन विभाग): १ हजार ५३९ पदे (अर्हता: कोणत्याही शाखेतील पदवी).

वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल (राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व इतर): ११ पदे.
३. सहायक अधीक्षक (कृषि व पदुम विभाग): ११ पदे.
४. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक): २५४ पदे (अर्हता: मत्स्यविज्ञान विषयातील B.F.Sc. पदवी).
५. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय: २३० पदे.
६. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग: १५५ पदे.
७. आदिवासी विकास विभाग: ६९ पदे.
८. लिपिक-टंकलेखक (महसूल व वन विभाग): ४८० पदे.
९. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग): ३३९ पदे.
MPSC Group C Combined Exam Vacancy Increase| Talathi Bharti PDF

Talathi Bharti Exam application date: परीक्षेची तारीख व अर्जाचे सुधारित वेळापत्रक

एमपीएससीने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रचलित पद्धतीने (Offline OMR आधारित) घेतली जाईल. वाढलेल्या पदांमुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे:
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: ०५ ऑगस्ट २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत).


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.