आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

BJP Sharad Pawar: दोन तृतियांश खासदारांच्या पाठिंब्यासाठी भाजपाची डीएमके, शरद पवारांना साद; मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे विधेयक पुन्हा मांडले जाणार?

Swati Jain   321   13-07-2026 17:17:10

BJP Sharad Pawar: दोन तृतियांश खासदारांच्या पाठिंब्यासाठी भाजपाची डीएमके, शरद पवारांना साद; मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे विधेयक पुन्हा मांडले जाणार?

२० जुलैपासून सुरू होत आहे. भाजपाने महत्त्वाच्या घटना दुरूस्ती करून घेण्यासाठी लोकसभेत दोन – तृतियांश खासदारांचे समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

२०२९ मध्ये महिलांना राजकीय आरक्षण लागू करणे, त्या सोबतच मतदारसंघांची पुनर्रचना करून लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवण्यासाठी घटना दुरूस्ती विधेयक मांडले जाण्याची दाट शक्यता आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात भाजपाने याच्याशी संबंधित घटना दुरूस्ती विधेयक लोकसभेत मांडले होते. परंतु, दोन – तृतियांश मते न मिळाल्याने ते पडले. भाजपामधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना दुरूस्तीचे नवीन विधेयक पावसाळी अधिवेशनातच मांडले जाणार आहे. परंतु, भाजपाला दोन – तृतियांश खासदारांचा लोकसभेत पाठिंबा आहे, हे निश्चित झाल्यानंतरच हे विधेयक मांडले जाईल.

भाजपाला लोकसभेत दोन तृतियांश खासदारांचा पाठिंबा आहे का?

तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेच्या २० बंडखोर खासदारांनी भाजपाप्रणित एनडीएला समर्थन दिले आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा लोकसभा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे लोकसभेतील भाजपाप्रणित एनडीचे एकूण संख्याबळ २९३ वरून वाढून ३२९ पर्यंत पोहोचले आहे. विधेयकावरील मतदानाच्या दिवशी जर लोकसभेतील सर्व खासदार उपस्थित राहिले तर विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपाला एकूण ३६० खासदारांच्या पाठिंब्याची (दोन तृतियांश) आवश्यकता असेल. त्यामुळे अद्याप भाजपाने दोन – तृतियांशचा आकडा गाठलेला नाही. बंडखोर खासदारांच्या एनडीएमधील प्रवेशास लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची मंजूरी मिळणे आवश्यक आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भाजपाला समर्थन मिळणार?

लोकसभेतील संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपाने आता विरोधी पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोर्चा वळवला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे लोकसभेचे एकूण ८ खासदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधेयकावरील मतदानाच्या दिवशी काही विरोधी पक्ष गैरहजर राहतील यासाठीही भाजपा प्रयत्न करत आहे. खासदार गैरहजर राहिल्यास आवश्यक असलेला दोन तृतियांशचा (३६०) आकडा पर्यायाने कमी होईल. नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे हे प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून विरोधकांनीही हालचाली सुरू केल्या आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.