आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

जांभे येथे पुरात अडकलेल्या ३० नागरिकांची थरारक सुटका

शरद लाटे  340   06-07-2026 16:22:12

गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांच्या तत्परतेने NDRF व अग्निशमन दलाकडून यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन

मुळशी, दि. ६ जुलै : मुळशी तालुक्यातील जांभे गावात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपलीकडे राहणाऱ्या सुमारे ३० नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून गंभीर परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अडकलेल्या नागरिकांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांचाही समावेश होता.

घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे पाटील यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ NDRF पथक व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या समन्वयातून तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.

बचाव पथकाने पुराच्या पाण्यात अडकलेल्या सर्व ३० नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. वेळेत केलेल्या या कार्यवाहीमुळे मोठी जीवितहानी टळली.

रेस्क्यू ऑपरेशननंतर शिवाजी बुचडे पाटील यांनी घटनास्थळी परिस्थितीची पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली. तसेच पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.

यावेळी NDRF पथक, अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी, महसूल प्रशासन, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी बचावकार्यात मोलाचे सहकार्य केले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि सर्व यंत्रणांच्या समन्वयामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 लोकांच्या प्रतिक्रिया


PCMC तहलका
Vaijanath Bhaskarrao shep 06-07-2026 16:30:30

Aap

PCMC तहलका
Vaijanath Bhaskarrao shep 06-07-2026 16:30:31

Aap

PCMC तहलका
Vaijanath Bhaskarrao shep 06-07-2026 16:30:32

Aap


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.